मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर यांची निवड
वडगाव मावळ : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईशी संलग्न असलेल्या वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदी 'लोकमत'चे पत्रकार सचिन ठाकर यांची, तर उपाध्यक्षपदी 'दैनिक मावळ'चे विशाल कुंभार आणि 'मावळ २४ तास'चे महादेव वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदाची धुरा 'साम टीव्ही'चे दिलीप कांबळे सांभाळणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मावळचे माजी आमदार, शिक्षण महर्षी आणि ज्येष्ठ पत्रकार दिवंगत कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर संघाच्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष विजय सुराणा, बाळासाहेब वाघमारे, भारत काळे, निलेश ठाकर, अभिषेक बोडके यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध - सचिन ठाकर
नवनियुक्त अध्यक्ष सचिन ठाकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, "मावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. समाजात वावरताना पत्रकारांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी मी समर्थ राहीन." तसेच, तालुक्यातील पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा आणि विम्याचे कवच उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक बोडके यांनी केले, सूत्रसंचालन विशाल कुंभार यांनी केले, तर नवनियुक्त अध्यक्ष सचिन ठाकर यांनी आभार मानले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
मुख्य प्रवर्तक: विजय सुराणा (सकाळ)
अध्यक्ष: सचिन गो. ठाकर (लोकमत)
उपाध्यक्ष: विशाल कुंभार (दै. मावळ), महादेव वाघमारे (मावळ २४ तास)
कार्याध्यक्ष: दिलीप कांबळे (साम टीव्ही)
सचिव: योगेश घोडके (लोकमत)
सहसचिव: दक्ष काटकर (सकाळ)
खजिनदार: विकास वाजे (लोकमत)
प्रकल्प प्रमुख: रवि ठाकर (प्रभात)
पत्रकार परिषद प्रमुख: अतुल चोपडे (प्रभात)
सल्लागार: बाळासाहेब वाघमारे (सकाळ), दत्तात्रय म्हाळसकर (महाराष्ट्र लाईव्ह १), भारत काळे (सकाळ), सचिन शिंदे (महाराष्ट्र लाईव्ह १), सुनील आढाव (इंद्रायणी वार्ता/महाईन्यूज)
सदस्य: निलेश ठाकर (प्रभात), सतीश गाडे (नवराष्ट्र), संजय दंडेल (सह्याद्री वार्ता), संजय हुलावळे (प्रभात), धनंजय नांगरे (इंद्रायणी वार्ता), अभिषेक बोडके (प्रजावार्ता), सचिन सोनवणे (पुण्यनगरी), राहुल सोनवणे (पुढारी), गणेश दुडम (न्यूज १८ लोकमत), मुकुंद परंडवाल (सकाळ)