वक्फ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : वक्फ महामंडळा सारख्या सामाजीक महत्वाच्या विभागात लाचखोरी करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आणि दलालांना तसेच समाजाची संपत्ती गिळणाऱ्या वक्फ माफियांना जनतेने कायदेशीर मार्गाने चांगली अद्दल घडेल असा धडा शिकवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे प्रदेश सचीव ऍड समीर शेख यांनी केले आहे.
कुणालाही वक्फ अधिकाऱ्यांनी लाच मागितली तर कारवाई साठी थेट पोलिसांना संपर्क करावा, अथवा 9850038689 या क्रमांकावर सल्ल्या साठी संपर्क साधावा असे आवाहन ऍड समीर शेख यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात वक्फ महामंडळाचे २ अधिकारी लाच घेताना पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतीबंधक खात्याने मंगळवारी केली . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे प्रदेश सचीव ऍड समीर शेख यांनी हे आवाहन केले आहे.