Breaking News

आघाडी सरकार पडलं तर .... सुप्रिया सुळेचे मोठे विधान ...


इंदापूर - 'करायचा तेवढा आवाज करा,सरकार पडलं तर बघू काय करायचं. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत, कधीतरी त्यांची सत्ता येईल. पण ती लवकर येणार नाही,” असं मोठं विधान  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. 


पदवीधरआणि शिक्षक  मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी त्या  इंदापूरात आल्या असता, बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  


“लोकं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडलं तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे,असेही सुळे म्हणाल्या. 


देशाचे प्रधानमंत्री शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पुण्याला येत आहेत. कदाचित ते आपले कौतुक करायला येणार असतील, आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल ? देशाचे प्रधानमंत्री जरी वेगळ्या विचाराचे असतील तरीदेखील त्यांना आपलं पुणे हवहवस वाटतंय असा टोला देखील त्यांनी लगावला.