Breaking News

'कोरोना किलर ' इलेक्ट्रॉनिक उपकरणास आयसीएमआर,एन आय व्ही कडून कार्यक्षमता प्रमाणपत्र

पुण्यातील उद्योजकाचे भारतातील पहिले संशोधन



पुणे :आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या 'कोरोना किलर ' या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र  देण्यात आले  आहे .पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि .या कंपनीने संशोधित केलेले आणि  अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे . कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

'कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते . या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे . तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 

पुण्यातील शिवणे भागात असलेल्या या कंपनीमध्ये या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज २०० उपकरणे निर्मितीची कंपनीची क्षमता आहे . ही क्षमता वाढवून दररोज ७०० पर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सर्व नियम पाळून वाहतूक साठी सरकार सहकार्य करेल अशी अपेक्षा भाऊसाहेब जंजिरे यांनी व्यक्त केली आहे. या उपकरणाचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जाणार आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दूरध्वनी : 9960000900. 
ई- मेल :  buisness@indotechindustries.com
वेब साईट www.indotechindustries.com