लॉक डाऊन आता नकोच : सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देऊया :विजयसिंह डुबल
' फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ ' चे आवाहन
पुणे : लॉक डाऊन हा कोरोना रोखण्याचा उपाय नसल्याचे सिध्द झाल्याने सरकारने आता पुन्हा लॉक डाऊन हा पर्याय विचारात घेऊ नये, सर्वांनी मिळून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर देऊया , असे आवाहन फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ ' चे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी पत्रकाद्वारे केले आहे. ' पुण्यात उद्योजक, व्यापारी आता लॉक डॉऊन सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा आणि राष्ट्रीय सचिव व्ही.के .बंसल यांनी डुबल यांच्याशी , तसेच राज्यातील इतर व्यापारी संघटनांशी आज लॉक डाऊन विषयावर चर्चा झाल्यावर महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या परिस्थितीची माहिती विजयसिंह डुबल यांनी दिली.
'सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये व्यापारी उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, धीर देणे आवश्यक आहे. आणि सुरक्षिततेच्या योजनांची जनजागृती करणे आवश्यक आहे, ' असे विजयसिंह डुबल हे यांनी म्हटले आहे.
'कोरोना साथीच्या काळात व्यापारी, उद्योजक आणि उद्योगांना सर्व पातळीवर अडचणींना तोंड द्यावे लागत असून या अडचणी सोडवणे, सरकार दरबार चे प्रश्न सोडवणे, मनोधैर्य उंचावणे, हे काम प्राधान्याने करणे आवश्यक आहे., पुन्हा लॉक डाऊन हा पर्याय विचारात घेऊन व्यापारी, उद्योजकांना संकटात टाकू नये, असे विजयसिंह डुबल यांनी म्हटले आहे.