...म्हणून त्या महिलांचे जीवन कायम अनुत्साही - मनिषा पाठक
फेमस राइटर, थिंकर पाठक यांनी सांगितला सुखी आयुष्याचा कानमंत्र
पुणे (विशेष प्रतिनिधी) - अनेक जणींत कायम नैराश्य असते, तर काही जणी त्याउलट असतात. कायम स्फूर्तीदायी, उत्साही... काही जणी यशाची शिडी चढत असतात, तर काही जण कायम त्या शिडीवरून घसरगुंडी खेळत असतात... काही जणी एकदम ठणठणीत, तर काही जणी कायम अनारोग्य घेऊन वावरत असतात... असं का होतं, हे आज अगदी सोप्या भाषेत फेमस राइटर, थिंकर आणि गाईड मनिषा पाठक यांनी फॅशनिस्टा मराठीच्या वाचकांना समजावून सांगितलं. आयुष्यातील अनुत्साह, नैराश्य, अनारोग्य घालविण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला.
फॅशनिस्टा मराठीतर्फे आज, 18 जुलैला दुपारी 1 वाजता झूम अॅपद्वारे ऑनलाइन सेमिनार घेण्यात आला. या कार्यक्रमात फॅशनिस्टा वाचकांनी घरी बसून सहभाग घेतला. आपले प्रश्न विचारले, त्यांच्या प्रश्नांचे निरसनही मनिषा पाठक यांनी केले. सुमारे अर्धा तास मार्गदर्शन आणि त्यानंतर अर्धा तास चाललेल्या प्रश्नोत्तराने फॅशनिस्टांच्या मनातील चालणारं कोलाहल शांत करण्यात मनिषा पाठक यांना यश आलं.
प्रारंभी प्रास्ताविकातून फॅशनिस्टा मराठीच्या सहसंपादक रेखा मोरे यांनी मनिषा पाठक यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅशनिस्टा मराठीच्या मुख्य संपादक सौ. शीतल अभिजीत वाघमारे होत्या. संपादक सौ. दीपा सुनील ढेपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात प्रामुख्याने पुण्याच्या नगरसेविका रुपाली दिनेश धावडे, सौंदर्यतज्ज्ञ मिताली संतोष माळी, नगरसेवक पत्नी आश्विनी वसंत मोरे, फॅशनिस्टाच्या कायदेशीर सल्लागार अॅड. इंदुमती वराळे, हेल्प फॉर यूच्या जनरल मॅनेजर मनिषा जैन, टेक्निकल सपोर्ट टीमच्या प्रमुख इंजि. अंजली कुलकर्णी, औरंगाबादच्या रिपोर्टर मानसी रोटे, शुभांगी भोकरे, मुंबईच्या रिपोर्टर ऐश्वर्या मुथा, पुण्याच्या रिपोर्टर कृती शेळके यांच्यासह बहुसंख्य वाचक महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला संचालिका इंजि. वर्षा मगाडे यांनी शुभेच्छा देत अशा प्रकारचे उपक्रम यापुढे राबविण्यास सूचवले.
संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहा
फॅशनिस्टा मराठीतर्फे विशेष सेमिनार