कचरा प्रकल्पास उरुळी देवाची ,फुरसुंगीकरांचा विरोध, आंदोलन सुरु
उरुळी देवाची / फुरसुंगी ( अंबादास गोरे ) - कचरा डेपो येथे ओपन कचरा डंपीग चालू झाले आहे व कचरा प्रकल्प सुरु करण्याचे काम जबरदस्तीने पुणे म.न.पा.करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी दोन्ही गावच्या गावकरी यांच्या वतीने आज २२ जुलै पासून बेमुदत कचरा गाड्या बंद आंदोलन करण्यात आले आहे.
माहे ३१ एप्रिल २०२० पर्यंत ग्रामस्थांनी कोरोना संसर्गामुळे कचरा टाकण्यासाठीची मुदत संपली आहे. मागील झालेल्या आंदोलना नंतर कोविड च्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत माननीय महापौर,कचरा डेपो आंदोलक, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख, तसेच पो निरीक्षक साठे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती.त्या चर्चेमध्ये उरूळी देवाची फुरसुंगी या हद्दीमध्ये भविष्यात कुठलाही नवीन कचरा प्रक्रिया उद्योग होणार नाहीत.असे स्पष्ट निर्देश हरीत लवादाने दिले असताना या निर्देशाचा अवमान करत म.न.पा. प्रशासनाने परस्पर २०० मेट्रीक टनाचा प्रकल्प उभारणीची नवीन काम सुरू केले आहे.सदर प्रकल्पास दोन्ही गावच्या ग्रामस्थ नागरिकांचा विरोध आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ४०० मेट्रीक टन कचरा बायोमायनिग करण्यात टाकण्यासाठी ची मुदत दि ३१ एप्रिल २०२० ला संपली आहे व मुदत संपुनही तीन महीन उलटले तरी देखील तो कचरा प्रक्रिया मध्ये न टाकता (ओपन डपींग) उघड्यावर खाली करण्यात येत आहे याचे चित्रण देखील उपलब्ध आहे.या परिस्थितीचा विचार करून उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा गाड्या बंदचे बेमुदत आंदोलन करत आहेत.