पुण्यात महिला पोलिसांची दंडेलशाही; सासू-सुनेला भररस्त्यात मारहाण
पुणे -
हडपसर रेल्वे ब्रिज जवळील फुटपाथवर चहा विकून आपल्या अपंग नवऱ्यासह
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या वृद्ध महिलेला हडपसर पोलीस स्टेशन
अंर्तगत मगरपट्टा पोलीस चौकीतील महिला पोलिसांनी अमानुष मारहाण
केली.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, गंगूबाई आणि लता या दोघी सासू-सून आहेत. मगरपट्टा
येथे कुमार पॅराडाईजजवळ लक्ष्मी लॉन्स रस्त्यावरील पादचारी मार्गावर चहाची
टपरी सुरू करण्यात आली होती. ही टपरी बेकायदा असल्याने त्यावर मंगळवारी
सायंकाळी महापालिकेकडून पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जात होती. त्या वेळी
या दोघींनी कारवाई करण्यास विरोध केला. कारवाई केली तर पेटवून घेऊन
आत्महत्या करू, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर महिला आणि पोलिसांमध्ये
जोरदार झटापट झाली.
टपरीचालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकास विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेसह दोघींना बेदम मारहाण करून गाडीत टाकले.
याप्रकरणी लता हके आणि गंगूबाई हके या दोघींना सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. राजेश खुडे यांनी या संदर्भात
फिर्याद दिली आहे.