डॉ. वर्षा रा. चौरे भारतीय यांचे टपाल तिकीट जारी
मुंबई: भारत
सरकारच्या टपाल विभागाकडून डॉ. वर्षा रामचंद्र चौरे भारतीय यांचे टपाल
तिकीट नुकतेच जारी करण्यात आले. यावेळी विश्व संविधान परिषद सदस्य,
विश्वशांतिदूत डॉ. सुधीर तारे, अंधेरी पोस्ट ओफिसचे राउत साहेब, एस एम
श्रीवास्तव साहेब, संपादक अमरसिंह राजे, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा
मुक्त पत्रकार फिरोज अश्रफ, अखिल भारतीय परिवारचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल
मडामे भारतीय, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णा देवासी भारतीय, महाराष्ट्र
प्रदेश अध्यक्ष ऍड. अभिमान पाटील भारतीय,
सचिव सुरज पांडे भारतीय, साजिद अकबर भारतीय, बॉलिवूडमधील दिग्दर्शक रवींद्र
अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वकर्तृत्वाने देशसेवेचा वसा घेवून समाज उन्नतीसाठी झटणाऱ्या, वेगवेगळ्या
क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचे भारत सरकारच्या डाक
विभागामार्फत माय स्टॅम्प से टेनंट या मालिकेअंतर्गत टपाल तिकीट जारी करून
त्यांना सन्मानीत करण्यात येते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल
असोशिएशनच्या माध्यमातून पार पडणार्या विविध शिबिरांमधून आरोग्य क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणार्या नवी मुंबईतील डॉ. वर्षा रा. चौरे भारतीय यांना
यंदाचा राज्यस्तरीय आदर्श डॉक्टर पुरस्कार देखील मिळालेला आहे.
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुंबईला येवून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या डॉ. वर्षा यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली आहे. मूळच्या उस्मानाबाद जिल्यातील इर्ला या खेडेगावातील डॉ. वर्षा आज नवी मुंबईत सक्षम राजकीय नेतृत्व करत असून त्या अखिल भारतीय परिवार च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. डॉ. वर्षा या युनाइटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पूलच्या सदस्य असून जुलै 2018 मध्ये सुरभी साहित्य संस्कृती अकॅडमी खांडवा मध्य प्रदेश यांच्याकडून राष्ट्रीय महिला गौरव सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे.