बार्शीचे वन परिक्षेत्र अधिकारी एन. डी. जाधव आणि एस.एस.सातपुते यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड
पुणे - माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्यामुळे बार्शीचे वन परिक्षेत्र अधिकारी एन. डी. जाधव आणि एस.एस.सातपुते यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्याचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी हा दिला निकाल दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वन क्षेत्रात सन २०१५ ते २०१६ मध्ये प्राण्यासाठी हौद बांधणे, पाणवठे तयार करणे, चाऱ्या खोदणे आदी कामे बोगस झाली होती. अनेक कामे मजुरांकरवी न करता यंत्र सामुग्रीने करण्यात आली होती. त्याचबरोबर कृती आराखडा न करता मनमानेल तश्या पद्धतीने करण्यात आली होती.
या संदर्भात उस्मानाबादचे आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी, बार्शीच्या वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता, त्यांनी ही माहिती दिली नाही. त्यानंतर या प्रकरणी सोलापूरच्या उपविभागीय वन अधिकाऱ्याकडे अपील केले असता, त्यांनी सात दिवसात माहिती देण्याचे आदेश दिले होते. तरीही बार्शीच्या तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही.
त्यानंतर सुभेदार यांनी पुण्याच्या माहिती आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्याची सुनावणी झाली असता बार्शीचे वन परिक्षेत्र अधिकारी एन. डी. जाधव आणि एस.एस.सातपुते यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी हा दिला निकाल दिला आहे. ही रक्कम त्यांच्या मासिक वेतनातून कपात करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
काय आहे आदेश ?