साडी सेंटरला आग ; पाच कामगारांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील देवाची उरळी येथील एका साडी सेंटरला गुरुवारी पहाटे तीन वाजता लागली होती. या आगीत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार राजस्थानमधील आहेत.
सासवड रोडवरील देवाची उरुळी परीसरात कपड्यांचे आणि साड्यांचे अनेक होलसेल दुकाने व गोडावून आहेत. या गोडावून मधून होलसेल दरात विक्री केली जाते. त्यामुळे गुरुवारी आणि रविवारी या परिसरात प्रचंड गर्दी असते. राजयोग साडी सेंटर हे भाडळे यांच्या मालकीचे असून ते सुरे चौधरी यांना भाड्याने दिले होते.
गुरुवारी पहाटे या साडी सेंटरला अचानक आग लागली. वरच्या एका रूममध्ये दुकानांत काम करणारे कामगार राहत होते. आग लागल्यानंतर त्यांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. राकेड रियाड, धर्माराम बडीयर, राकेश मेघवाल, सुरज शर्मा व धिरज चांड अशी यांची नावे आहेत.
आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे बंब आले होते पण आग आटोक्यात येईपर्यँत या कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीत किमान दोन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.