अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले
नवी दिल्ली : आजपासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्या राममंदिर प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला आदेश दिला आहे.
मुख्य याचिका वगळता सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. खटल्यात केवळ मुख्य पक्षकाराचीच बाजू ग्राह्य धरली जाणार आहे. इतर याचिकामुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाचे नोंदवले आहे. रामजन्मभूमी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या याचिका बाजूला केल्या. अनेक संस्था आणि व्यक्तींनी अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या. सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांना या खटल्यातून बाजूला केले आहे.