Breaking News

कटियार यांचे तिकीट राम मंदिराचा मुद्दा उकरून काढल्यामुळेच कापले ?


लखनऊ – यंदा भाजपचे पाच वेळचे खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट कापण्यात आले असून कटियार यांची उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरप्रश्नी आंदोलन जिवंत ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे. भाजपने यंदा उत्तर प्रदेशमधून रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी त्यांना उमेदवारी दिली नाही. यावेळी कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे कटियार समर्थकांमध्ये आता चर्चा रंगली आहे. कटियार यांना नरेंद्र मोदींवर राम मंदिर निर्मितीसाठी दबाव आणणे आणि अडवाणी यांना पाठिंबा देण्याची किंमत चुकवावी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय दबक्या आवाजात म्हणत आहेत.