Breaking News

पुण्यात ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली


माजी खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात




पुणे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुण्यात आज ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती च्या वतीने माजी  खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला होता परंतु पुणे पोलिसांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी हा मोर्चा पुढे नेण्यास परवानगी नाकारली, त्यामुळेमाजी  खासदार भुजबळ आणि इतर ओबीसी नेते कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन शनिवार वाड्यासमोर  रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले . 


दरम्यान माजी  खासदार समीर भुजबळ आणि इतर ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ठिय्या आंदोलन केल्यामुळे शनिवार वाड्या लगतच्या परिसरात रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली होती.


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी तसेच राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा यासह विविध मागण्यांसाठी  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता.

पुण्यात ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली माजी  खासदार समीर भुजबळ पोलिसांच्या ताब्यात

Posted by Pune Live on Thursday, December 3, 2020