Breaking News

आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करा ...


पुण्यात महिलांची मागणी 




पुणे - महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र महिला  विकास मंचच्या वतीने देण्यात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 


या निवेदनात म्हटले आहे की , राज्यात  दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या ,बलात्काराच्या घटना वाढत आहेत.त्यामुळे जन्मलेल्या मुलीचे देखील आयुष्य सुरक्षित राहिले नाही. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबाला अन्याय होऊन देखील न्यायासाठी अनेक वर्षानुवर्ष   प्रतीक्षा करावी लागते आणि न्यायालयात वारंवार खेटे घालावे  लागतात. त्यामुळे समाजातील महिलांनी स्वतःचे असुरक्षीत जीवन जगताना  न्याय व्यवस्थेवर  कोणत्या दृष्टिकोनातून पाहावा , महिलानी न्याय मिळण्याची अपेक्षा कोणाकडे करायची,  विश्वास कसा ठेवावा असे अनेक  प्रश्न निर्माण होत आहेत.


महिलांचे,मुलीचे जीवन जगणे अतिशय कठीण झाले आहे व यामुळे च मुलीना जन्म देणे म्हणजे काळजीवाहु ,भीतीदायक व गुन्हा वाटत आहे .  प्रदेश सरकारने महिलांच्या हिताच्या व सुरक्षेच्या दृष्टीने " दिशा " कायदा मंजूर केला आहे. दिशा कायद्यानुसार पीडितांना लवकर न्याय मिळणार आहे.  त्याच  धर्तीवर महाराष्ट्र सरकारने दिशा कायदा लवकरात लवकर पारित करून महिलांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही यासाठी योग्य ती कार्यवाही करून आंध्र सरकारचा आदर्श घ्यावा, असे महाराष्ट्र महिला  विकास मंचच्या प्रमुख कालिंदी  पाटील यांनी म्हटले आहे.