दरोड्याच्या गुन्हयातील दोन फरार आरोपींना अटक
लोणीकंद गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई
मांजरी खुर्द ( प्रतिनिधी ) - दरोड्याचा गुन्ह्यात पाहिजे असलेलय आणि नऊ महिन्यांपासून होते फरार असलेल्या दोन आरोपीना जेरबंद करण्यात लोणीकंद गुन्हे शोध पथकास यश आले आहे.
लोणीकंद पोलीस ठाणे गु र नं 1002/2019 भा दं वि 143,147,148,149,336,337,324,323,395,427 प्रमाणे दि 18/11/2019 रोजी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध गुन्हे शोध पथक करीत होते. शोध घेत असताना दि.10/08/2020 रोजी पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांना सदर गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी दत्ता गायकवाड व किशोर जाधव हे सप्तमी हॉटेल, लोणीकंद येथे येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने दोन इसमांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1) दत्ता रंगनाथ गायकवाड वय 21 वर्षे, रा. काळे यांचे खोलीत, जे जे नगर, वाघोली, ता हवेली, जि पुणे, 2) किशोर विश्वनाथ जाधव वय 20 वर्षे, रा गुरुकृपा आश्रमचे पाठीमागे, दुबेनगर, वाघोली, ता हवेली, जि पुणे, अशी असून त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना वर नमूद आरोपींनी त्यांचे घरात ठेवलेले एकूण 1,54,000रु किंमतीचे एकूण 29 मोबाईल काढून दिले असून ते गुन्ह्याचेकामी जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपी सद्या पोलीस कोठडीत आहेत.
नऊ महिन्या पासून दोन आरोपी फरार होते,त्यांना लोणीकंद गुन्हे शोध पोलीसांनी तांत्रिकदृष्ट्या, गोपनीय बाबींचे आधारे जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. आरोपी कडून चोरलेला माल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
सदर कार्यवाही संदीप पाटील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ,डॉक्टर सई भोरे पाटील हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी,प्रताप मानकर वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय ढोणे साह्यक पोलीस निरीक्षक, हणमंत पडळकर पोलीस उप निरीक्षक, बाळासाहेब सकाटे,श्रीमंत होनमाने,संतोष मारकड,दत्ता काळे,समिर पिलाणे,ऋषिकेश व्यवहारे,सुरज वळेकर या पथकाने कार्यवाही केली.
दरोड्याच्या गुन्हयातील दोन फरार आरोपींना अटक लोणीकंद गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई
Posted by Pune Live on Thursday, August 13, 2020