दीड लाखाची सुपारी घेऊन तळेगाव एमआयडी कंपनीमधील मॅनेजरला मारहाण
गुन्हे शाखेकडून पर्दाफाश , तीन आरोपीना अटक
याबाबत पोलिसांनी सांगितले कि, दिनांक 30/07/2020 रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मारुती सुझुकी एस क्रॉस KA 51MK 53 45 मध्ये बसून डोंगशीन कंपनी मधून घरी चाललेल्या असताना सीनियर जनरल मॅनेजर नामे मुथया सुबय्या बडेदरा यास मोटर सायकलवर दोन इसम येऊन त्या गाडीची धडक दिली व आणखी दोघे जण येवुन हातात हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरला दोन्ही पायाच्या नडगीवर जोरात मारून दुखापत केली व फ्रेक्चर केले यामुळे चार अज्ञात इसमवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा तपास वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते.
तसेच दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा असताना पोलीस निरीक्षकपद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकास दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमी दाराच्या मार्फतीने तसेच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली.
त्यामधील 1)करणकुमार चल्ला मत्तु वय २३ रा. गांधीनगर,देहुरोड २ ) बालाजी रमेश मुदलीयार वय२७ रा. MB कॅम्प देह रोड, ३ ) राकेश शिवराम पेरूमल वय २५ रा. MB कॅम्प देहुरोड हे आरोपी यांना ताब्यात घेतले असून ४ ) मुस्ताक जमील शेख वय २५रा. गांधीनगर देहुरोड यास कोरोना झाले असल्याने व उपचार घेत असल्याने ताब्यात घेण्याची तजवीज ठेवली आहे
सदर आरोपीतांकडे सखोल चौकशी करता चौकशीमध्ये आशिष ओव्हाळ रा.विकास नगर ,देहूरोड,पुणे यांनी आम्हाला दीड लाखाची सुपारी देऊन मला एक डोण्गशीन कंपनीचा मॅनेजर त्रास देत आहे तुम्ही त्यास फॅक्चर करा असे सांगून सुपारी दिली असल्याबाबत चौकशीत निष्पन्न झाले आहे सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली API पृथ्वीराज ताटे, ASI विजय पाटील, HC प्रकाश वाघमारे, HC सचिन गायकवाड, PN गणेश महाडिक स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे