पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण
पुण्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे..
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. आता यानंतर त्यांच्या कुटुंबाची टेस्ट करण्यात आली. आता त्यांच्या कुटुंबातील आठ जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे महापौर मोहोळ यांच्यासह एकूण 9 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सामान्य लक्षणं आहे. दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी शनिवारी ट्विटरवरुन दिली होती.
थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 4, 2020
आपला,
मुरलीधर मोहोळ, महापौर