पोलीस मित्र कासटला दोन दिवस पोलीस कोठडी
पुणे - खंडणी प्रकरणात अटकेत असलेला पोलीस मित्र जयेश कासट यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कासट पोलीस कोठडीत असताना इतर आरोपींची नावे उघड करणार का ? याकडे आता लक्ष वेधले आहे.
शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्हयात
अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख
रुपये उकळणाऱ्या आरोपीकडून पोलीस मित्र म्हणून मिरवणारा जयेश कासट ( रा.
नारायण पेठ ) याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती.
शनिवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर आज न्यायालयात उभे करण्यात आले असता,
न्यायालयाने
दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पोलिस अधिकृत रित्या कासटच्या विघ्नहर्त्या न्यासाबरोबर काम करीत होते. गणेशोत्सवात हा कासट पोलिस व्यासपीठावर मिरवत होता. त्यामुळे त्याच्या या पराक्रमात पोलिस आणि पत्रकार सामील असल्याशिवाय ते शक्य नाही, अशी चर्चा आहे.