Breaking News

कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १६ मजुरांचा मृत्यू

पुणे - पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल, म्हणून त्यांनी लेकराबाळांसह बिहारमधून पुणे गाठले. एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते. तिथेच एका संरक्षक भिंतीच्या आधाराने झोपडीत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी त्यांनी काबाडकष्ठ केले, रात्री जेवले, एकत्र गप्पागोष्टी केल्या आणि झोपले. झोपेतच ज्या भिंतीने आधार दिला, तीच भिंत भल्या पहाटे त्यांच्या संसारावर कोसळली आणि बघता-बघता 1६ जणांना मृत्युने साखरझोपेत गाठले. 

पुण्यातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. काल (शुक्रवार) दिवसभर पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड वॉल खचून मजुरांच्या कच्च्या घरांवर कोसळली. त्यामध्ये 1६ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील वेगवेगळ्या जिल्हातील कटीयार, कोंडीयाल छोट्या-छोट्या खेडयातून पोट भरण्यासाठी अनेक मजूर पुण्यासह मुंबई व अन्य शहरात दाखल होतात. त्याप्रमाणेच कटीयार जिल्हातील शर्मा, सिंह, देवी अशी वेगवेगळी कुटुंबे आपल्या कुटुंब कबिल्यासह पुण्यातील कोंढवा परीसरात दाखल झाली. एका बांधकाम प्रकल्पवर काही दिवसांपासून काम करु लागले.

दरम्यान, सकाळी 7.30 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेला बिल्डर आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा दावा केला.

नवलकिशोर राम म्हणाले की, मजुरांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना कंपाऊंडच्या बाजूला राहण्यासाठी निवारा करुण देण्यात आला होता. या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहोत.
दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी शेजारीच असलेल्या एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ "ट्रांझिट  कॅम्प"च्या झोपड्या थाटल्या. याच झोपड्यात कामगार व त्यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत होते. शुक्रवारी दिवसभर काम सूरु असतानाही कामगारांनी इमारतीमध्ये काम केले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी काम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे एकत्र गप्पागोष्टी करीत होते. महिलांनी जेवण बनवून सर्वांनी जेवण केले. काही वेळ मुलांसमवेत खेळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी लवकर उठण्यासाठी सर्वजण झोपी गेले.
सगळेजण पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा ज्या भिंतीच्या आधाराने त्यांचे संसार फुलू लागले होते, त्याच भिंतीने घात केला. ती भिंत त्यांच्या झोपडयावर कोसळली. त्यामध्ये 16 कामगार, त्यांच्या बायका-मुलांचाही मृत्यू झाला.

मृतांची अधिकृत यादी : 
1) आलोक शर्मा - 28 वर्षे
2) मोहन शर्मा - 24 वर्षे
3) अमन शर्मा - 19 वर्षे
4) अजितकुमार शर्मा - 7 वर्षे
5) रवि शर्मा -19 वर्षे
6) लक्ष्मीकांत सहानी - 33 वर्षे
7) अवदेश सिंह - 32 वर्षे
8) सुनील सिंग - 35 वर्षे
9) ओवी दास - 2 वर्षे
10) सोनाली दास - 6 वर्षे
11) भिमा दास - 28 वर्षे
12) संगीता देवी - 26 वर्षे
13) रावलकुमार शर्मा - 5 वर्षे
14) निवा देवी - 30 वर्षे
15) दिपरंजन शर्मा

पुण्यातील कोंढवा येथे बहुमजली इमारतीच्या पार्किंगची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दु:ख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. कोंढवा दुर्घटनेला दोषी असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  

दोन्ही बाजूच्या बिल्डरांसह 14 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे पोलिसांना याप्रकरणी दोन्ही बांधकाम सुरु असलेल्या कांचन डेव्हलपर्सचे आणि आल्कन स्टायलस लॅंडमार्कसचे बिल्डर यांच्यासह एकूण 14 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.