Breaking News

पुणे : निष्क्रिय पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांची बिहारला बदली



पुणे - पुण्यात निष्क्रिय ठरलेले परिमंडल - ४ चे  पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांची बिहार सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा पदभार स्वप्ना मोरे यांना  देण्यात आला आहे. 


उस्मानाबादमध्ये निष्क्रिय ठरलेले पंकज देशमुख साताराला गेले होते, तेथून एक वर्षाच्या आत पुण्यात बदली करण्यात आली. पुण्यात आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त  म्हणून नेमणूक करण्यात आली  होती, परंतु वाहतूक विभागात झोल केल्याने अवघ्या सहा महिन्यातच  परिमंडल - ४ चे  पोलीस उप आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे परिमंडल - ४ चे उप आयुक्त  म्हणून ऑर्डर निघाली होती, पण आता बिहारला बदली करण्यात आली आहे. 


उस्मानाबादला असताना, अनेक  प्रकरणात ते चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. सातारा येथेही  तोच  उद्योग केला तर आता पुण्यातही तीच परंपरा सुरु ठेवली आहे.