घरफोडी चोरी करणारी टोळी गजाआड; सहा जण अटकेत
लोणीकंद गुन्हे शोध पथकाची कारवाई
मांजरी खुर्द - केसनंदमध्ये घरफोडी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी सहा जणांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
दि 12/08/2020 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे निलेश रघुनाथ सातव वय 29 वर्षे, रा. गणेशनगर, आव्हाळवाडी रोड, वाघोली, ता हवेली जि पुणे हे ते काम करीत असलेल्या मल्होत्रा केबल्स प्रा लि चे विश्वजित वेअरहाऊसचे कायमचे बंद असलेले शटर कोणीतरी अज्ञात इसमांनी कोपरेत उचकटून आत प्रवेश करून वेअरहाऊस मधील एकूण 1,24,490रु किंमतीचे केबल कॉइलचे बंडल फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने घरफोडी चोरी करून नेलेबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील गेले मालाचा व आरोपींचा गुन्हे शोध पथक शोध घेत होते.
दि. 16/08/2020 रोजी गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील भंगारवाल्यांना चोरीचा माल न घेणेबाबत नोटिसा देत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, संशयित इसम नामे अजय खंदारे व नवनाथ बांगर हे दोघेही त्यांचेकडील काही बॉक्समध्ये कसलेतरी केबल कॉईलचे बंडल हातात घेऊन जाताना 2 ते 3 वेळा पाहिलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या दिशेने तपास सुरू केला.
लोणीकंद गावचे हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असताना एक इसम संशयितरित्या मिळून आला. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव 1) अजय उर्फ लिंबराज हिरामण खंदारे वय 19 वर्षे, रा. सोमेश्वर पार्क, लोणीकंद, ता. हवेली, जि पुणे असे सांगून त्याचेकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदर केबल कॉइलचे बंडल त्याचे इतर साथीदार नामे 2) नवनाथ उर्फ आदित्य अशोक बांगर वय 25 वर्षे, रा. बांगर वस्ती, केसनंद, ता हवेली, जि पुणे , 3) हेमंत उर्फ गणेश पांडुरंग गाडेकर वय 22 वर्षे रा भिल्लवस्ती, थेऊर, ता हवेली, जि पुणे, 4) प्रदीप उर्फ दादा नंदू कांबळे वय 24 वर्षे, रा मु गावडेवाडी पो शिरसवडी, ता हवेली, जि पुणे, 5) प्रदूत प्रसन्नता गुली उर्फ माझी वय 22 वर्षे, रा वाडेगाव रोड, केसनंद, ता हवेली जि पुणे मूळ पश्चिम बंगाल, 6) *मिलन उत्तम बऊरी वय 21 वर्षे, रा केसनंद, ता हवेली, जि पुणे मूळ पश्चिम बंगाल असे सांगून सदर गुन्हा वरील सर्वांनी संगणमताने केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील एकूण 1,24,490रु किंमतीचे केबल कॉइलचे वेगवेगळ्या साईज व रंगाचे बंडल जप्त करण्यात आले आहेत. कोर्टाने आरोपींना 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई ही प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली हणमंत पडळकर (पोलीस उपनिरीक्षक), बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, संतोष मारकड, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली आहे.