एसीबीच्या अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांना राष्ट्रपती पदक
पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राष्ट्रपती विशेष सेवा पदके जाहीर करण्यात आली, यात पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांचा समावेश आहे.
पुणे शहर, नवी मुंबई, राज्य गुप्त विभाग, गुन्हे अन्वेषण येथे सेवा बजावणाऱ्या सुषमा चव्हाण यांनी, नगर येथील लेंगिक शोषणाच्या प्रकरणात २० आरोपींचा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना एकूण ४७५ पुरस्कार मिळाले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल पुणे लाइव्हच्या सहसंपादक रेखा मोरे यांनी त्यांची खास भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.