नारायणगाव : पाच लाखाची लाच घेताना एक सपोनि आणि एक पोलीस शिपाई अटक
पुणे - तक्रारदार यांचे विरुध्द नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हयातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून त्या गुन्हयात इतर दोन आरोपीना अटक न करण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना नारायणगाव पोलीस स्टेशनमधील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस शिपाई अश्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारविरुद्ध गुन्हा नोंद आहे. तक्रारदार यांचे विरुध्द नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हयातील दोषारोपपत्र न्यायालयात लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून त्या गुन्हयात इतर दोन आरोपीना अटक न करण्यासाठी १) अर्जुन केशव घोडेपाटील. वय - 38 वर्षे, सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग -2,नारायणगाव पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण. 2) श्री.धर्मात्मा कारभारी हांडे. वय - 37 वर्षे , पोलीस शिपाई बक्कल नंबर 870, नेमणूक- जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण (नारायणगाव केंद्र) यांनी पाच लाख लाचेची मागणी केली होती. यातील आरोपी लोकसेवक क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचेसाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली.सदर मागणीस आरोपी लोकसेवक क्र 1 यांनी सहमती दर्शवून क्रमांक 2 यास लाच घेण्यास प्रेरित केले होते.
त्यानंतर तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिट संपर्क साधला असता, पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक, सुनिल बिले,पोहेकॉ दिपक टिळेकर, पो.कॉ. रतेश थरकार, पो.कॉ.सौरभ महाशब्दे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे युनिट यांनी सापळा रचून पाच लाख लाच घेताना या दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर १) अर्जुन केशव घोडेपाटील. वय - 38 वर्षे, सहायक पोलीस निरीक्षक, वर्ग -2,नारायणगाव पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण. 2) श्री.धर्मात्मा कारभारी हांडे. वय - 37 वर्षे , पोलीस शिपाई बक्कल नंबर 870, नेमणूक- जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण (नारायणगाव केंद्र) यांच्याविरुधन ११ ऑगस्ट रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.