कांचन जाधव यांची आरटीओपदी निवड
यवतमाळ - जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र धामणगाव (देव) येथील कांचन जाधव यांची एमपीएससी परीक्षेमधून आरटीओपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
कांचन जाधव यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धामणगाव ( देव) व माध्यमिक शिक्षण मुंगसाजी बाबा विद्यालय धामणगाव ( देव) येथेच झाले आहे, नंतर शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ येथे यंत्र अभियांत्रिकी या शाखेत पदवीका प्राप्त केली. त्यानंतर प्रोव्हिन्सियल आटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड महिंद्रा नागपूर येथे सर्व्हिस अँडव्हायजर म्हणुन काम केले व सोबतच आटोकॅड चा कोर्स पूर्ण केला, त्यानंतर AMVI(RTO) या पदाचा अभ्यास चालू केला व दि.३१ मे २०१७ ला झालेल्या पूर्व परीक्षेत यश संपादन केले. त्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यांची आरटीओ पदी निवड झाली आहे.
धामणगाव (देव) जि. यवतमाळ.येथील एका सामान्य कुटुंबात .कांचन जाधव जन्म झाला असून त्यांचे आई-वडील सौ.आशाबाई व श्री.प्रेमसिंग जाधव लेकीच्या यशाबद्दल भारावून गेले आहेत.