Breaking News

ऑनलाईन दस्त नोंदणी पद्धतीला पुणे बार असोसिएशनचा विरोध



नोंदणी विभागाचे लिव्ह अँड लायसेन्स करारनाम्याच्या संदर्भात महाराष्ट्र भाडेकरू अधिनियम 1999 चे कलम 55 आणि 40 मधील कायद्यातील तरतुदींमध्ये दुरुस्तीस तसेच सदनिकांचे  विक्री करारनामे(बिल्डर बुकिंग अँग्रीमेंट) ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यास पुणे बार असोसिएशन आणि कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वकिल वर्गाने तीव्र विरोध केला आहे

पुणे बार असोसिएशन आणि कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या संयुक्त शिष्ट मंडळाने याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून नोंदणी पद्धतीतील बदलास विरोध दर्शविला आहे.

प्रस्तावित बदल हा मिळकतीचे मालक भाडेकरू ,वकील  यांचेवर अन्यायकारक आहे त्यामध्ये अनेक त्रुटी असून प्रस्तावित  दुरुस्ती नुसार लाखो रुपये किमती च्या मिळकतींचे लिव्ह अँड लायसन्स करारनामे नोंदणी न करता   फक्त फाईल करावे असा प्रस्ताव नोंदणी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे

शासनाचे सदरचे दोन्ही प्रस्ताव हे वेळीच स्थगित केले नाही तर गरज पडल्यास महाराष्ट्रातील तमाम वकील वर्ग त्यांची संघटना सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि न्यायालयात जातील असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला

 या प्रसंगी पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष adv सतीश मुळीक ,,कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष adv सुधाकर कुटे, उपाध्यक्ष adv प्रवीण नलावडे ,adv अमोल काजले ,adv संजय कर्डीले ,adv कल्याण शिंदे ,adv पांडुरंग थोरवे ,adv सोमनाथ हरपुडे , अडवोकेट राजेश खळदकर इत्यादी वकील वर्ग उपस्थित होते.