बाळासाहेब सुभेदार यांना पुरस्कार प्रदान
लोकहितासाठी माहिती अधिकार प्रभावी – अशोक खेमका
पुणे : राज्य आणि केंद्र सरकारकडून
लोकहितासाठी खर्च करण्यात येतो. मात्र, अनेकदा त्यात भ्रष्टाचाराचाही धोका
असतो. तो रोखायचा असेल, तर माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर झाला
पाहिजे,’ अशी अपेक्षा हरियाना सरकारचे प्रधान सचिव अशोक खेमका यांनी व्यक्त
केली. पुण्यात दर सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो, हा प्रयोग
हरियाना राज्यातदेखील राबविण्याचा आपण विचार करू, असेही ते या वेळी
म्हणाले.
सजग नागरिक मंचाच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार
पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या वेळी ते बोलत होते. उस्मानाबादेचे माहिती
अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात
आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे
स्वरूप होते. संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी
उपस्थित होते.
“अनेकदा
माहिती अधिकारात अपिलीय अधिकाराची जबाबदारी ही मोठ्या अधिकाऱ्यांवर असली
पाहिजे. हरियानात राज्य माहिती आयोगामार्फत सहा ते आठ महिन्यांत एखादे
प्रकरण निकाली निघते. जिल्हा स्तरावर कायद्याचा प्रभावी वापर होत असला तरी
मंत्रालयात होताना दिसत नाही,’ असेही खेमका यांनी सांगितले.
पुरस्काराला उत्तर देताना सुभेदार यांनी माहिती अधिकार
कायद्याचा आपण कसा आणि का वापर केला याबद्दल अनुभव कथन केले. “प्रामाणिकपणे
काम केले तर त्यात यश मिळते. अपयश आले तरी यश येईल याची खात्री झाली. एका
माहिती अधिकार कायद्याने मला ताकद मिळवून दिली आहे. त्यामुळे चांगले काम
करता येणे शक्य झाले,’ असे सुभेदार यांनी सांगितल.
…तर मेट्रो तोट्यात
हरियाना राज्यात मोठा गाजावाजा करून मेट्रो सुरू करण्यात
आली. ती मोफत देऊ, असेही सांगण्यात आले. चार हजार कोटींची बॅंकेची हमी
देण्यात आली. तरीदेखील फारसे यश आले नाही. बारा किलोमीटरच्या लांबीच्या
मेट्रोसाठी दहा कोटी रुपये दरमहिना खर्च आहे, असे सांगून खेमका म्हणाले,
“आता पुणे, मुंबई, नागपूर येथे मेट्रो येणार आहे; पण हरियानाच्या मेट्रोची
ही स्थिती असेल तर महाराष्ट्रातील मेट्रोची काय स्थिती असेल.
कोण आहेत अशोक खेमका ?
हरियाणा सरकार मध्ये अशोक खेमका कडक शिस्तीचे सनदी अधिकारी आहेत, ते सध्या प्रधान सचिव आहेत.महाराष्ट्रात तुकाराम मुंडे जसे आहेत, त्यापेक्षा किती तरी पटीने कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानी अनेक प्रकरणात कारवाई केली आहे, त्यामुळे त्यांची 28 वर्षात 56 वेळा बदली झाली आहे.खेमका यांच्या हस्ते बाळासाहेब सुभेदार यांना पुण्यातील सजग नागरिक मंचच्या वतीने सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला..