गायीचे धर्मापलीकडचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवा : डॉ . वल्लभभाई कठिरिया
पुणे : गो -संगोपनाचे महत्व भारतीय कृषी आणि अर्थकारणाच्या दृष्टीने
महत्वाचे असल्याने ,घरोघरी गोसेवा व्हावी ,गायीचे धर्मापलीकडचे महत्व
सर्वांपर्यंत पोहोचवावे 'असे आवाहन रविवारी 'राष्ट्रीय कामधेनू आयोग ' चे
अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ . वल्लभभाई कठिरिया यांनी पुण्यात केले .
गो -सेवा ,गो -संगोपन आणि कृषी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था ,संघ परिवारातील स्वयंसेवक कार्यकर्त्यांची अनौपचारिक बैठक रविवारी सकाळी 'कौशिकाश्रम ' (मित्रमंडळ ,पर्वती) येथे झाली . यावेळी सर्वांशी अनौपचारिक संवाद साधताना डॉ.कठिरिया यांनी हे आवाहन केले .
गो सेवा समिती आणि आरोग्यभारती या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता .
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर हे होते . डॉ . शरद खरे यांनी प्रास्ताविक केले . बैठकीला राजेंद्र लुंकड ,प्रदीप फासे ,डॉ . सुहास गटणे यांच्यासहित ४० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .
डॉ कठिरिया म्हणाले ,'गो सेवा ,गो -संगोपनाबद्दल आजही समाजात गैरसमज आहेत . गोसेवा हा विषय धार्मिक नाही तर कृषीविषयक,शास्त्रीय आणि आर्थिक आहे . भावना ,आस्था ,श्रद्धेच्या पलीकडे समाजात गो सेवा पोहोचवली पाहिजे .त्यामुळे पर्यावरण ,शेती ,शेतकऱ्यांना मदत होईल .
संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जी उद्दिष्टे सर्वांसमोर ठेवली आहेत ,ती पूर्ण करताना गोपालन उपयुक्त ठरणार आहे . शहरातही विकास आराखड्यात गोपालनासाठी राखीव भूखंड ठेवले पाहिजेत,असेही डॉ . कठिरिया यांनी सांगितले