भाजपची साथ सोडणार शॉटगन ?
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा असून त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शायरीच्या अंदाजात याचे संकेत दिला आहे. त्यांनी त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास आणि विश्वनीयतेची कमतरता असल्याचेही म्हटले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपल्या ट्विटरवर सिन्हा यांनी २ ट्विट केले असून पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी साहेब देश तुमचा आदर करतो. मात्र, आमच्या नेत्याबद्दल लोकांमध्ये विश्वासार्हता राहिलेली नाही. जे नेता करत आहे त्यावर लोक विश्वास ठेवत आहेत का? नक्कीच नाही, असा मोदी यांना टोमणा मारला आहे.
त्याचबरोबर त्यांनी मागील निवडणुकीत दिलेले वचन अद्यापही पूर्ण केलेले नाही. अशी आशा आणि प्रार्थना करतो की पुढे मी तुमच्या समोर असणार नाही, असे सिन्हांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिताना मोहब्बत करने वाले कम ना होंगे. तेरी महफील में शायद हम न होंगे, अशी एक शायरीही लिहिलेली आहे. शत्रुघ्न यांनी सध्यातरी औपचारीक घोषणा केलेली नाही. पण त्यांच्या या ट्विट्ने एक अस्पष्ट संकेत दिले आहेत. पण पक्ष सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षाला हात देऊ शकतात हे त्यानंतरच पुढे येईल.